Share

आदित्य ठाकरे तुम्ही खडकवासला येथून निवडणूक लढवा, पुणे जिल्हाप्रमुखांची मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात येऊन विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसेनेकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी आदित्य ठाकरेंनी खडकवासला मतदारसंघातुन निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. खडकवासला मतदार संघ छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्षेत्र असल्याने त्यांनी या ठिकाणावरून निवडणूक लढवावी अशी मागणी रमेश कोंडे यांनी केली आहे.

तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून ते मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मनोहर जोशी मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात यावं असे म्हटलं आहे.

दरम्यान,शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना फेसबुकच्या माध्यमातून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. राऊत यांना आदित्य यांना गळाभेटीचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. ‘महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे.’ असं फोटोच्या खाली कॅप्शन दिले आहे. या पोस्ट मधून राऊत यांनी आदित्य ठाकरे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेतच दिले आहेत.

शिवसेना भाजप युतीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर आता शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून शिवसेनेकडून आता त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!