टीम महाराष्ट्र देशा : एसएससी बोर्डाच्या नवीन नियमानुसार १०वीच्या विद्यार्थ्यांना शालेय अंतर्गत गुण देणे बंद केले आहे. त्यामुळे यंदा दहावीची टक्केवारी प्रचंड घसरली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये ११वीच्या प्रवेशा बाबत चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
या भेटीमध्ये आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या ११वी च्या प्रवेशाबाबत चर्चा केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याचे अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका यंदाच्या निकालाला बसला असून यामुळे अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची मोठी पीछेहाट झाली आहे. राज्य मंडळाचे अनेक विद्यार्थी नापासही झाले आहेत. यामुळे हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची भीतीही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान अंतर्गत गुण देण्याची पद्धत बंद केल्याने यंदा १०वी चा निकालाची टक्केवारी प्रचंड घसरली आहे. त्यामुळे पुढील प्रवेशाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही चिंता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी बोलणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील स्पष्ट केलं होत.अकारावीच्या प्रवेशासाठी CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परिक्षेचेच गुण ग्राह्य धरले जावेत यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचंही तावडे यांनी सांगितल होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

