Share

‘अलबेला सजन..’गाण्यावरील अदाने किशोरींनी घातली प्रेक्षकांना भुरळ…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनेक चित्रपटांतून भूमिका साकारून वेगळी ओळख निमार्ण करणारी मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणेंचे आजही सौंदर्य प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मोठया पडद्यासह त्यांनी छोटया पडद्यावर देखील उत्तम कामगिरी केली आहे. त्यांचा नुकताच व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.

नुकतेच किशोरी यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या मनमोहक सौंदर्याचं दर्शन चाहत्यांना घडलं आहे. यात त्यांनी साडी नेसली आहे, सोबतच दागिने घालून सर्व साजशृंगार केला आहे. तसेच व्हिडिओमध्ये त्या ‘अलबेला सजन…’ या गाण्यावर त्यांच्या अदा आणि एक्स्प्रेसशन्स दाखवताना दिसत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला हजारो चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे. किशोरी नेहमी सोशल मीडियावर त्यांचे डान्स व्हिडिओ शेअर करत असतात, ज्याला चाहतेही भरभरून पसंती देतात. विशेष म्हणजे किशोरी ‘बिग बॉस मराठी’ या रियॅलिटी शोमध्ये दिसल्या होत्या. यानंतर त्या आता छोट्या पडद्यावरील ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

https://www.instagram.com/reel/CVIRXUUlZYx/?utm_medium=copy_link

किशोरी यांनी बऱ्याच हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या समवेत भूमिका असलेल्या ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तसेच ‘शिर्डी साईबाबा’ याद्वारे त्यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं होतं. त्या सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांसाठी बऱ्याचदा डान्सचे व्हिडिओ देखील शेअर करत असतात, त्यास भरपूर पसंती ही मिळत असते.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!