टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये एका दुर्धर आजाराचा सामना करत असल्याची पोस्ट सोशल मिडियाच्या माध्यमातून तिने ही धक्कादायक बातमी दिली. अभिनेता इरफान खान हा न्यूरोएंडोक्राइन ट्युमर हा दुर्धर आजाराचा सामना करतो आहे आणि आता अभिनेत्री सोनाली बेंद्रे. बॉलिवूड कलाकारांची दुर्धर आजारांची मालिका वाढत आहे. सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शो मध्ये ती परीक्षक होती. ‘हम साथ साथ है’, ‘सरफरोश’, ‘लज्जा’, ‘दिलजले’, ‘मेजर साहब’ यासारख्या चित्रपटांतून तिने अभिनय केला आहे.
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 4, 2018
सोनाली बेंद्रेने ट्विटरवरच्या माध्यमातून, कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं आहे.
ट्विटरवरील भावनिक पोस्टमध्ये तिने लिहिलं की, ‘कधी कधी तुम्हाला काही गोष्टींची कुणकुण लागते आणि अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात बदल होतो. मला हाय-ग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. सतत वेदना जाणवत असल्याने काही चाचण्या केल्या आणि त्यातून कॅन्सर झाल्याचं अनपेक्षितपणे निदान झालं. माझे कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी खूप साथ दिली आहे. त्या सर्वांचे मी आभार मानते.डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी त्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या मार्गातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्यास मी सज्ज आहे. यात गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून मला मिळत असलेल्या प्रेमाची फार मदत होत आहे. कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने मी ही लढाई लढण्यास सज्ज आहे.’
तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनी केलं सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

