🕒 1 min read
मुंबई : गोरखपुरचे खासदार व अभिनेते रवि किशन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः गोरखपुर येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल त्यांनी यावेळी चर्चा केली. यावेळी रवि किशन यांच्या पत्नी देखिल उपस्थित होत्या.
दुसरीकडे, मजूरांना त्यांच्या गावी सुरक्षितपणे पोहचण्यासाठी खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.
पिंपरी-चिंचवडमधून परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रवाना
दरम्यान, कोल्हापुरात परप्रांतिय कामगारांचा संयम सुटल्याच पाहायला मिळाले. उत्तरप्रदेशला जाण्यासाठी हजारो कामगार रस्त्यावर उतरले. या मजुरांना कोणीतरी आज ट्रेन सुटणार असल्याचं सांगितलं होतं. या अफवेने हे कामगार शिरोली एमआयडीसी परिसरातून कोल्हापूरच्या दिशेने चालत आले. कोल्हापुरातून आतापर्यंत तीन ट्रेन कामगारांना घेऊन परराज्यात गेल्या आहेत. मात्र आज आणखी ट्रेन असल्याची चुकीची माहिती या कामगारांना कोणीतरी दिली आणि एकच हल्लकल्लोळ झाला.
अर्थव्यवस्था संकटात : सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्या : चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
