Share

त्या नालायक विश्वजीत कदमने माझ्यावर अत्याचार केला, अभिजीत बिचुकलेंचा धक्कादायक आरोप

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके याच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुतासारखं सरळ करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. मंगळवेढा येथील पाणीप्रश्न आजवर कोणीच का सोडवला नाही असा सवाल करत आपण या निवडणुकीत निवडून येणार असा विश्वासही अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केला आहे.

पंढरपूर विठू माउली मुळे प्रसिद्ध आहे पण एखाद्या खेडेगावापेक्षा भकास हे पंढरपूर झाले आहे, मन रमत नाही मात्र विठू माउलीसाठी याव लागतंय. निवडणुका लढत असताना मला अनेक अनुभव आले त्यात मी वरळीला आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण स्वतः उद्धवजी किंवा शिवसेनेकडून माझ्यावर कोणताही दबाव आला नाही. मात्र पण तो नालायक विश्वजीत कदम आहे त्याने माझ्यावर पोटनिवडणुकीत अत्याचार केला आहे. असा सनसनाटी आरोप अभिजित बिचुकले यांनी केला आहे. ते पंढरपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, २०१८ मध्ये झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा पोटनुवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी माझे अपहरण करून जबरदस्तीने माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता असा आरोप यापूर्वीच अभिजीत बिचुकले यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!