Share

अबब! चक्क भंगाराच्या साहित्यापासून साकारला मोदींचा पुर्णाकृती पुतळा

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. त्यांच्यासाठी अनेकजण काय करतील ते सांगता येत नाही. काही दिवसापूर्वीच पुण्यात तर अशाच एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच उभारले होते. या मंदिराची अवघ्या देशभरात चर्चा झाली. त्यानंतर आता आंध्र प्रदेश पित्रा पुत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तब्बल 14 फुट उंचीचा पुतळा उभारला असून हा पुतळा भंगाराच्या साहित्यापासून बनवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर रोजी भाजप नगरसेवक मोहन राजु यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा हा पुतळा बंगळुरुच्या एका उद्यानात बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पुतळ्यासाठी भंगारातील दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे एक टन भंगाराचे साहित्य वापरण्यात आले आहे. या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य तेलंगाणाच्या हैद्राबाद, तमिळनाडूच्या विशाखापट्टण आणि आंध्र प्रदेशच्या गुंटुर शहरातून जमा करण्यात आले आहे. यासठी बाईकची साखळी, गीअर व्हील्स, लोखंडी सळई, नट, बोल्ट असे साहित्य या पुतळ्यासाठी वापरण्यात आले आहे.

तर मोदींच्या चेहरा, केशभुषा, दाढी आणि चष्म्यासाठी वायरचा उपयोग करण्यात आले आहे. साधारण कुठलाही पुतळा कांस्य धातू पासून बनवला जातो. परंतु पंतप्रधान मोदींचा पुतळा भंगारातील साहित्यापासून बनवताना त्यांचा चेहरा बनवण्यात अडचण आली असे व्यंकटेश राव म्हणाले. हा पुतळा बनवायला तब्बल 25 दिवसांचा कालावधी लागला. हा पुतळा बनवण्यासाठी 10 कलाकार दिवस रात्र काम करत होते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!