Share

पुण्यात आता दररोज होणार ७ हजार कोरोना चाचण्या!

Published On: 

पुणे: धारावीसारख्या दाट लोकसंख्या व झोपडपट्टी भागात देखील जर कोरोना आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यासारख्या शहरात कोरोना आटोक्यात येत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागला आहे. आता पुण्यातील प्रशासनाने देखील धारावीतील पॅटर्न आत्मसात करण्याचे ठरवले आहे.

आता याच कालावधीत दररोज  होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण थेट पाच हजारांहून ७ हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच, दोन्ही महापालिका क्षेत्रांसह, तिन्ही कॅन्टोन्मेंट क्षेत्रात व ग्रामीण भागात रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग , ट्रॅकिंग व ट्रीटमेंट यावर अधिक भर देणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून हि चिंतेची बाब आहे.

अखेर ‘तो’ निर्णय रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला

कोरोना रुग्णांची हि वाढती संख्या रोखण्यासाठी, सध्याच्या रुग्णांची साखळी तोडणे व भविष्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगत लोकांवर दहा दिवसांचा लॉकडाऊन पुन्हा थोपवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली रेल्वेमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना ‘ही’ कळकळीची विनंती

दिपक म्हैसेकर यांनी सांगितले कि, पुणे जिल्ह्यातील सध्या दररोज ४ ते ५ हजार कोरोना संशयित रुग्णांची तपासणी केली जाते. हेच प्रमाण आता दररोज सात हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन  कोरोना  पॉझिटिव्ह असलेल्या सर्व रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील करणार आहे. दरम्यान, पुण्याचे विभागीय आयुक्त असलेले डॉ. दीपक म्हैसेकर यांचा वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर त्यांनी स्वतःला घरी विलग्नवास केला आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्याची मुदतवाढ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!