Share

खुलताबाद-औरंगाबाद महामार्गावर चार वर्षांत ४०० अपघात, ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना साकडे!

Published On: 

औरंगाबाद : खुलताबाद-औरंगाबाद महामार्गावर गेल्या चार वर्षांत ४४० अपघात झाले असून यातील अनेकांना उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अयाज बेग यांनी खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. खुलदाबाद ते औरंगाबाद अंतर २५ कि.मी. असल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकताच गंगापूर व वैजापूर तालुक्याच्या दौरा केला. यादरम्यान खुलताबाद नगरपालिकेचे नगरसेवक अयाज बेग यांनी मंत्री टोपे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या, मिनी महाबळेश्वर सारखे व पर्यटन स्थळे असलेले म्हैसमाळ, सुलिभंजन दत्त मंदिर, शहरातील औरंगजेब यांची समाधी, जरजर बक्ष यांची दर्गा त्याचप्रमाणे भद्रा मारोती मंदिर, वेरूळ घृष्णेश्वर मंदिर असे धार्मिक क्षेत्र व पर्यटन स्थळे आहेत. यामुळे या तालुक्यात दररोज हजारो पर्यटकांसह शेकडो प्रवाशी औरंगाबाद-खुलताबाद महामार्गावरून प्रवास करत असतात.

तालुक्यातील रस्त्यावर रहदारी जास्त असल्याने नेहमी अपघात होत असतात. दरम्यान अपघात, दुर्घटना आपतकालीन परिस्थिती नंतर जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय सेवा मिळावी या हेतुने खुलताबाद रुग्णालय येथे ट्राॅमा केअर सेंटरची आवश्यकता आहे. खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटर नसल्याने अपघात ग्रस्तांना व इतर रुग्णास तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही व गंभीर जखमींना उपचारासाठी औरंगाबाद घाटी येथे न्यावे लागलेले आहे. खुलताबाद शहरामध्ये ट्राॅमा केअर सेंटर, २४ तास डॉक्टर, आयसीयू, नर्सिंग होम, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे व इतर सोय सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!