Share

पिंपरी-चिंचवडमध्ये १० जण करोनामुक्त, मात्र तरीही काळजी वाढली

Published On: 

पिंपरी-चिंचवड : मंगळवारी रात्री ९ वाजता आणखी एका करोनाबाधीत व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या व्यक्तीच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या असून भोसरी येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, या व्यक्तीला दोन आठवडे होम क्वारंटाईन राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे शहरात आत्तापर्यंत १० जण करोनामुक्त झालेले आहेत, तर दोघांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, एका बाजूला ही आनंदाची बातमी येत असताना पिंपरी-चिंचवडकरांच्या आनंदावर विरजण टाकणारी सुद्धा बातमी समोर येत आहे.दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे परिसरातील ९२ जण सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी ३५ जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक सहभागी झाल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

या व्यक्तींच्या त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने उद्या ‘एनआयव्हीकडे’ तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. हे लोक किती जणांच्या संपर्कात आले असतील हे सांगणे कठीण आहे. आणखी १८ नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!