टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. प्रत्येक मतदारसंघाचा निकाल आता समोर येत आहे. वडगाव शेरी मतदारसंघाच्या निकालाचा पहिला कल हाती आला आहे.
यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनिल टिंगरे हे आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार जगदीश मुळीक हे पिछाडीवर पडले आहेत. तर खडकवासल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सचिन दोडके हे आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार भीमराव तापकीर हे पिछाडीवर आहेत.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार जगदीश मुळक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनिल टिंगरे यांच्यात चुरशीची लढत असल्याचं दिसत आहे.
UPDATE
भाजप : 112
शिवसेना : 68
कॉंग्रेस : 38
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 47
वंचित : 00
मनसे : 02
महत्त्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1187221025420742656?s=20

