टीम महाराष्ट्र देशा : आंध्र प्रदेश राज्यातून रोज नव नवीन राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. आज एका व्हायएसआर काँग्रेसच्या आमदाराने चक्क मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतली आहे. त्यामुळे आता इथून पुढे आंध्र प्रदेशच्या राजकारणात शपथविधीची नवीन प्रथा पडण्याची शक्यता आहे. आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी ईश्वर साक्ष शपथ घेतो की…असे न म्हणता मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नाव घेत शपथ घेतली.
शपथविधी नंतर ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांप्रति माझी निष्ठा आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे माझ्यासाठी देवा समान आहेत. त्यामुळे मी अशी शपथ घेतली. मात्र सभागृहाच्या सभापतींनी कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांना तत्काळ दुसऱ्यांदा शपथ घेण्यास सांगितले. त्यानंतर कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी ईश्वर साक्षीने शपथ घेतली.
दरम्यान जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री पदावर आल्यापासून आंध्र प्रदेशच्या राजकारणात रोज नव नवीन किस्से घडताना दिसत आहेत. त्यातलाच एक म्हणजे आंध्र प्रदेश राज्यात पाच उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशच्या तसेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत. यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या काळात कापू आणि ओबीसी समाजातील प्रत्येकी एका आमदाराला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते.जगमोहन रेड्डी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील प्रत्येकी एका आमदाराला उपमुख्यमंत्रीपद दिलेआहे


