Share

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोल्हापूरच्या युवकांनी तयार केले सर्वात स्वस्त व्हेंटिलेटर

Published On: 

कोल्हापूर : जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचे रुग्ण देशात झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात करोना बाधिताचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या अशीच वाढत राहिली तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित साधनं पुरणार तरी कशी असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. हे पाहता प्रशासनाने व्हेंटिलेटर निर्मितीसाठी कोणी प्रयत्न करू इच्छित असेल त्यांनी यावर काम करावं असं आवाहन केलं होतं.

या पार्श्वभूमीवर व्हर्सटाईल इक्विपमेंट्स व ग्नात ग्रुप, गोकुळ शिरगांव MIDC, कोल्हापूर, या कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने, वरून जैन, पुष्कराज जांवडकर, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. संजय कुलकर्णी यांनी करोनाशी संबंधित असलेले व्हेंटिलेटर तयार केलं आहे.

इतर व्हेंटिलेटरची किंमत लाखो रुपयांच्या घरात असताना या कंपनीने फक्त ५० ते ६० हजार रुपये किंमतीचे ऑक्सीजन बेस व्हेंटिलेटर बनवले आहे. हे व्हेंटिलेटर स्वस्त तर आहेच शिवाय त्याचा आकार लहान असल्याने ते कुठेही ने आण करता येऊ शकते. हॉस्पिटल्स असो किंवा ॲम्बुलन्स, याचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो.

खेडोपाडी जर हे व्हेंटिलेटर पोहचले तर सर्व सामान्यांसाठी तसेच वैद्यकीय यंत्रणेसाठी हे वरदान ठरेल. खासदार धैर्यशील माने स्वतः जाऊन याची पाहणी केली तसेच संबंधितांसोबत चर्चा केली. लवकरात लवकर शासनाकडून या व्हेंटिलेटरच्या निर्मितीसाठी अधिकृत परवानगी मिळेवी व याचा फायादा संपूर्ण महाराष्ट्राला व्हावा यासाठी धैर्यशील माने यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!