Share

‘तू प्रेग्नेंट कधी होतीस?’ म्हणत श्रियाच्या पोस्टवर चाहत्यांची कमेंट

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन चित्रपटाच्या माध्यमाने सर्वपरिचित आहे. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. श्रियाने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत श्रियाने ती आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मात्र,हे पाहून चाहत्यांना मात्र धक्काच बसला.

दरम्यान शेअर केलेल्या या व्हिडिओत श्रिया पती राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू आंद्रेई कोस्चिव दिसत आहे. आंद्रेईच्या हातात कप आहे आणि श्रिया ही तिच्या मुलीला कडेवर घेऊन खेळत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आंद्रेई त्यांच्या मुलीजवळ जातो. शेवटी व्हिडीओत २०२० मध्ये गर्भवती असतानाचे श्रियाचे बेबीबंप मधील फोटो दिसत आहेत. सगळ्यांना ‘हॅलो, २०२० चा क्वारंटाईन वेळ आमच्यासाठी अप्रतिम होता. एकीकडे संपूर्ण जगात सगळ्या गोष्टी वर-खाली होत होत्या तर, दुसरीकडे आमचे आयुष्य संपूर्णपणे बदलले होते. आमचे आयुष्य हे रोमांच, उत्साहाने परिपूर्ण झाले होते. आमच्या जीवनात एक देवदूत एक परी आम्हाला आशीर्वाद म्हणून भेटली. आम्ही देवाचे आभारी आहोत!’ अशा आशयाचे कॅप्शन श्रियाने दिले आहे.

https://www.instagram.com/p/CU5GnpSsaSB/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या या व्हिडीओवर मॅडम तू प्रेग्नेंट कधी होतीस?, ‘ अभिनंदन, पण ही बातमी ऐकून धक्का बसला आहे, ‘ती गर्भवती होती आणि तिने मुलीला जन्म दिला हे एकूण फक्त मलाच धक्का बसला की सगळ्यांना’, ‘तू कधीच सांगितले नाही…तुझ्या फोटोंकडून पाहून देखील आम्हाला कळाले नाही…अभिनंदन, ‘ अशा अनेक कमेंटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. श्रियाने बॉयफ्रेंड आंद्रेई कोस्तिवशी १२ मार्च २०१८ मध्ये लग्न केले. श्रियाच्या मुलीचा जन्म गेल्या वर्षी झाला आहे. २०२० मध्ये श्रिया आई झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!