Share

‘पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव होईल तेव्हा ते ट्रम्प समर्थकांप्रमाणेच गोंधळ घालतील’

Published On: 

🕒 1 min read

राणाघाट:- पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कारणांमुळे भाजपने बंगालमधील वातावरण चांगलेच तापवले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा जेव्हा पराभव होईल तेव्हा ट्रम्प समर्थकांप्रमाणेच ते गोंधळ घालतील, असे ममतांनी भाकित केले आहे.

बहुतांश नेते केंद्रीय यंत्रणांच्या तपासाच्या भितीपोटी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अनेकांना भाजप धमकावून पक्षात ओढून घेत आहे. भाजपला पश्‍चिम बंगालमध्ये किंमत राहिली नसून अन्य पक्षांच्या निष्क्रीय आणि भ्रष्ट लोकांना सामील करुन घेतले जात आहे. भाजपचा पक्ष म्हणजे कचराकुंडी झाली असून या ठिकाणी निष्क्रिय, भ्रष्ट नेत्यांना सामील करुन घेत आहेत, असे ममता यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!