टीम महाराष्ट्र देशा : आषाढी एकादशीनिमित्त सुरु झालेल्या आळंदी ते पंढरपूर वारीत, शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, अशी विनंती वारीतील मायमाऊलींनी केली आहे. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका अशा आशयाचे फलक वारीतील मायमाउलींनी हातात घेतले आहेत.
आषाढी एकादशी निमित्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी ते पंढरपूर ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात आज ( बुधवार ) सकाळी प्रस्थान झाले आहे. लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात या वारीत सहभागी झाले आहेत. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई आहे, जनावऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, अशा अनेक प्रश्नांना कंटाळून बळीराजा आत्महत्या करत आहे.
दरम्यान शेतकरी आत्महत्या थांबावी यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकरी मायमाउलींनी शेतकऱ्यांना विनंती केली आहे. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका अशी कळकळीची विनंती मायमाउलींनी केली आहे. ‘शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका’ अशा आशयाचे फलक मायमाउलींनी हातात घेत समाजप्रबोधन केलं आहे.
विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबीर, प्लास्टिकमुक्तींच्या मुद्द्यांवरूनही समाजप्रबोधन केलं जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

