उस्मानाबाद : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा बळी जात असल्याचे दुर्देवी चित्र तयार झाले आहे. सोयाबीनच्या वाढलेल्या किंमती केंद्राच्या एका निर्णयाने गडगडत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीतर व्यापाऱ्यांचे हित साधत आहे. शेतकऱ्यांची फसवणुक करुन घोर निराशा करणाऱ्या या सरकारमुळे सोयाबीनचे दर पडले. शेतकरी विरोधी असलेल्या केंद्र सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचा आरोप शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले असून सोयाबीन आयात त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे.
ते म्हणाले की, ‘गेल्यावर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्याने सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर्षी सोयाबीनचे चांगले उत्पादन होणार असा अंदाज आहे. तेव्हाच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गतच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या जीएम-सोयाकेक आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जीएम सोयाची आयात करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या किंमतीवर झाला आहे. शिवाय आपल्याकडील सोयाबीन देखील आताच बाजारात येणार आहे. देशातील सोयाबीनचे दर कोसळत आहेत. असा शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊन केंद्राने शेतकऱ्यांचा घात केला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोयाबीनचा दर बारा हजारापर्यंत होता, पण आयातीचा निर्णय झाल्यानंतर म्हणुन कोसळुन थेट सात ते आठ हजारावर आला होता. तेव्हा आता या निर्णयाने पुन्हा दर कमीच होत आहेत. सरकारने मालाचे भाव पाडण्याचाच जाणीवपुर्वक प्रयत्न केल्याचे दिसुन येत आहे.’
दुसऱ्या बाजुला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा टक्के साखर उताऱ्यांच्या आधारावर उसाचा रास्त व किफायतशीर दर २९० रुपये प्रति क्विंटल म्हणजे दोन हजार ९०० रुपये प्रतिटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राने वाढविलेल्या रासायनिक खतांच्या किमती, इंधनाच्या किमतीचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसतो, जेव्हा भाव द्यायची वेळ येते तेव्हा व्यापारी मनोवृत्ती ठेवणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे ही सोयाबीनची आयात थांबवावी अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सेहवागने पंजाबच्या संघाची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत…’
- आरोग्य विभागाच्या भरतीचे प्रवेश पत्र पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळणार; युवासेनेच्या पाठपुराव्याला आले यश
- ‘राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न कशासाठी? ‘भाजप’ महिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘या प्रस्थापितांच्या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे पुन्हा सिद्ध झाले’
- सलमान खान सोबत काम करतांना जॅकी उर्फ जग्गुदादाला असा आला अनुभव..


