Share

मानखुर्द मशीदीवरील बेकायदेशीर भोंग्याविरोधात विहिंप शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Published On: 

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरातील मशिदीच्या बाहेर लावलेल्या बेकायदेशीर भोंग्याविरोधात तेथील स्थानिक तरूणी करीश्मा भोसलेने आवाज उठवला आणि पोलिसांत रीतसर तक्रारही केली.पोलिसांनी मात्र “चोर सोडून सन्याशाला फाशी” या न्यायाने करीश्माच्या आईलाच नोटीसीद्वारे ताकीद दिली.विहिंपचे अॅड.कौशिक म्हात्रे यांनी डी.सी.पी.आणि स्थानिक पोलिस ठाण्यात उत्तरादाखल आपले म्हणणेही मांडले आहे.

या सर्व प्रकरणातील विशेष बाब म्हणजे सदर मशीद एका टोकाला आणि भोंगा आहे मशीदीपासून 150 मीटर लांब असलेल्या खांबाला.त्यामुळे सकृतदर्शनी सदर भोंगा हा अन्य धर्मीयांना त्रास देण्यासाठीच आहे असे दिसते.

गेल्या दोन आठवड्यांपासून हे प्रकरण तापत आहे.स्थानिकांच्या कृती समितीनेही याबाबत आवाज उठविला आहे.तरीही स्थानिक पोलिस ठाण्याने बेकायदेशीर भोंगा काढण्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.म्हणूनच विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून निवेदन दिले.रामचंद्र रामुका, मोहन सालेकर, श्रीराज नायर आणि अॅड.कौशिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात खालील माणण्या केल्या आहेत.

1)माननीय उच्च न्यायालयाच्या 2014 मधील निर्देशानुसार भोंग्यावरून अजान देणे हा मुस्लिमांचा धार्मिक अधिकार होऊ शकत नाही.यास्तव मशिदीच्या बाहेरील भोंगा बेकायदेशीर असून तात्काळ उतरवण्यात यावा. 2)या प्रकरणात सर्वप्रथम आवाज उठविणारी तरूणी करीश्मा भोसले आणि कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळावे. 3)या सर्व घटनेची उच्चस्तरीय पोलिस अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी व्हावी.

अशाच प्रकारचे निवेदन मुबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंहजी यांनाही प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.परिषदेच्या कोकण प्रांताचे सचिव मोहन सालेकर आणि श्रीराज नायर पोलिस आयुक्तांना निवेदन देताना म्हणाले की, पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी अन्यथा विहिंप आणि बजरंगदलाला या विषयावर आंदोलन करावे लागेल.

संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान, सारथीच्या बैठकीत गोंधळ

नॉन-कोविड रुग्णांना उपचार मिळत नाहीत – देवेंद्र फडणवीस

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!