Share

बॉक्सिंगचा मुळशी पॅटर्न : वैष्णवी मांडेकरची आखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

Published On: 

पुणे : पुण्यातील मार्डन महाविद्यालयाकडून खेळणारी राष्ट्रीय खेळाडू व मुळशीची सुवर्णकन्या वैष्णवी दादाराम मांडेकर हिने ८१ किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच वाघोली येथील बीजेएस महाविद्यालयात पार पडली.

या स्पर्धेत ती पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याने या स्पर्धेची कसून तयारी ती करत आहे. ती सध्या पुण्यातील मार्डन महाविद्यालयात कला शाखेच्या तिसऱ्य़ा वर्षात शिक्षण घेत असून गतवर्षी झालेल्या जागतिक महिलादिनी तिने मातोल क्रीडा प्रकारात सहा इंच खिळ्यांवर झोपून अवघ्या पाच मिनीटे चोविस सेकंदात एक टन फरशा फोडण्याचा नवा विश्वविक्रम सुध्दा केला आहे.

तसेच ती सध्या पुण्यामधील पिंगळे स्पोर्ट अँकेडमी येथे अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाँक्सींग चा सराव करीत आहे. नुकत्याच अकोला येथे झालेल्या सिनीयर स्टेट (वरिष्ठ महिला) गटात बाँक्सींग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. तर पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलामध्ये झालेल्या आखिल भारतीय कराटे व किक बाँक्सींग नॅशनल चँम्पीयन स्पर्धे्तही सुवर्णपदक घेत वर्चस्व राखले होते.

तिने मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल माँडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव व क्रीडाप्रशिक्षक विक्रम फाले यांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या कामगिरीचे समाजाच्या सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. आता उत्तरप्रदेशला होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केले असून पुणे विद्यापीठाचा नाव लौकीक राखणार असल्याचे तिने सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206076818291249152?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206075623048744960?s=20

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!