Share

आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश ‘आयर्नमॅन’, सर्वात अवघड ‘ट्रायथलॉन’चं जेतेपद

Published On: 

🕒 1 min read

जगात सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धा यंदा आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी जिंकली आहे. अभिनेता मिलिंद सोमण यांच्यानंतर लोहपुरुषाचा हा किताब पटकावणारे ते दुसरे भारतीय, तर भारतातले पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत.

फ्रान्समधील ट्रायथलॉन या स्पर्धेत कृष्णप्रकाश यांनी 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकलिंग हे अवघ्या 14 तास 8 मिनिटात पूर्ण केलं.
कोण आहेत कृष्णप्रकाश?
कृष्णप्रकाश हे 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महत्त्वाची पदं सांभाळली आहेत.
त्यांची 2012 मध्ये मुंबईत अतिरिक्त आयुक्त, दक्षिण विभाग म्हणून बदली झाली.
मुंबईतील दक्षिण विभागातच दरवर्षी मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. ही स्पर्धा आझाद मैदना-वरळी-आझाद मैदान अशी होते. या स्पर्धेत देश-विदेशातील हजारो स्पर्धक भाग घेतात. या स्पर्धेचं नियोजन करणं म्हणजे पोलिसांसाठी मोठी कसरत असते.
मात्र 2013 मध्ये कृष्णप्रकाश यांनी या स्पर्धेचं नियोजन अगदी सहज केलं होतं.

ट्रायथलॉन म्हणजे काय?

ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेलं असतं.

वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर धावण्याचा समावेश होता. ‘आयर्नमॅन’ हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन 17 तासांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!