Share

अमोल कोल्हेंना मुंबई राष्ट्रवादीचे प्रभारी करा – युवक कार्यकर्त्यांची मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईचे राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून अमोल कोल्हे यांना जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी मुंबई युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज बैठक पार पडली, बैठकी नंतर मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला, आता आगामी विधानसभा निवडणुकाही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकी सारखा पराभव विधानसभा निवडणुकीतही स्वीकारावा लागू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली. बैठकीनंतर माजी आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज्यात जर आघाडीला ५०-५० % जागा मिळणार असतील तर मुंबईतही पन्नास टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, तेवढ्या शक्य नसेल तरी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी बैठकीत केली असल्याचे आहिर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, या जागा निवडून येण्यासाठी नव्हे तर पक्ष संघटना वाढवण्यासाठी देण्यात याव्यात आणि त्यासाठी निवडणूक लढवणे आवश्यक आहे असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर १९९९ सालापासून काँग्रेसबरोबर आघाडी केल्याने कमी जागा मिळत होत्या. त्यामुळे याबाबत काँग्रेसशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. असेही त्यांनी म्हंटले. तसेच खासदार अमोल कोल्हे यांना विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईचे राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात यावी. अशी मागणी मुंबई युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचेही त्यांनी म्हंटले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!