मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या संरक्षणासाठी च्या ताफ्यातील पोलीस चालक कोरोनाग्रस्त झाला होता. पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात 14 दिवस उपचार घेतल्यानंतर हा पोलीस चालक कोरोनामुक्त झाला आहे.
खारघर येथे राहणारा हा पोलीस चालक केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस ताफ्यात पोलीसव्हॅनवर चालक म्हणून बांद्रा येथे कर्तव्यावर तैनात होते.त्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते मात्र अंगात कणकणी असल्याने त्यांनी स्वतःच कोरोना ची टेस्ट करून घेत पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात ते दाखल झाले होते. तेथे 14 दिवस उउपचार घेतल्यानंतर आता ते पूर्ण बरा झाले आहेत.
परराज्यातील मजुरांच्या प्रवासी शुल्कासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी
कोरोनावर मात केल्याबद्दल त्यांच्या सहकारी पोलिसांनी या पोलीस चालकाचे अभिनंदन केले आहे. केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी ही या पोलीस चालकाच्या तब्येतीची दूरध्वनीद्वारे संपर्क साधून चौकशी केली आहे. कोरोना ला घाबरू नका. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी घरीच थांबावे असे आवाहन या पोलीस चालकाने केले आहे.
#corona : राज्यात तब्बल २ लाख ९७ हजार व्यक्ती काँरंटाईन


