Share

VIDEO- ‘मला कॉलर उडवायला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं’ – उदयनराजे

Published On: 

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीयेथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक खासदार आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला दोन्ही छत्रपती एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

“आजकाल अनेक जणांना प्रश्न पडतो की उदयनराजे नेहमी कॉलर का उडवता ? त्याच कारण आज मी सांगतो गोपीनाथ मुंडे नेहमी सांगत लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर काम करतो त्यालाच कॉलर उडवायचा अधिकार आहे. कारण नसताना अलीकडच्या काळात आजी माजी मंत्र्यांनी त्यावर टीका टिपण्णी केली आहे”. असा नाव न घेता उदयनराजेंनी शरद पवारांना सुनावलं आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीयेथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा. उदयनराजे भोसले बोलत होते.

दरम्यान, साताऱ्यामध्ये ‘आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात’ अस म्हणत शरद पवारांनी उदयन राजेंच्या स्टाईलवर शाब्दिक फटकारे मारले होते. त्याला उदयनराजेंनी उत्तर दिले आहे.

पहा गोपीनाथ गडावरील भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ- 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!