औरंगाबाद- मराठवाड्यात लावण्यात आलेल्या वृक्षांची सर्वांनी ‘माय प्लांट्स ॲप’वर नोंद करावी असं आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं वृक्ष लागवडीच्या अनुषंगानं घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते. सध्या राज्यात वृक्ष लागवड सप्ताह सुरु असून या सप्ताहात कोणी, कुठे आणि किती वृक्ष लागवड केली याची नोंद करण्यासाठी हे ॲप सुरु करण्यात आलं असून ७ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत त्यावर नोंद करता येणार असल्याची माहिती भापकर यांनी यावेळी दिली. प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावून जगवावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
https://youtu.be/14tBjfjz9U4


