आझाद मैदान- धनगर समाजाला ST मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या ढोल गर्जना आंदोलनात सहभागी होऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ढोल वाजवून धनगर समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
भाषणातील महत्वाचे मुद्दे-
- धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
- धनगर समाज आणि मराठा समाजाचे प्रश्न सारखेच आहेत त्यांना हि असच झुलवत ठेवलं आहे.
- सरकारकडे भीक मागायला आता जायचं नाही, निर्णय घेण्याची वेळ आपली आली आहे.
- धनगर आहे की धनगड हे महत्त्वाचं नाही तर समाज किती उपेक्षित आहे हे पाहायची वेळ आहे.
- काही ना वाटतंय कि तुमच्याकडे आले की त्यांना काय वाटेल, पण आदिवासी आणि धनगर या दोघांना एकत्र घ्यायचं आहे.
- प्रत्येकाचं आरक्षण शाबूत ठेऊन निर्णय घ्यायचा आहे
- एसटी आरक्षणात तुमचं साडेतीन टक्के मिळवून तुम्हाला दिल हि तुमची मागणी काही चुकीची नाही
- तुमच्या ढोलचा आवाज आमच्या कानापर्यंत आला आहे
- ज्यांनी चार वर्षात काही केलं नाही त्यांना आता राम राम करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

