पुणे :-कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये पुणे विद्यापीठ प्रशासनातर्फे वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जात आहे. तसेच परीक्षा शुल्क निगडित असलेले लेट फीच्या नावाखाली हजारो रुपयांची लुटमार केली जात आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे.
अभाविप पुणे महानगराच्या वतीने विद्यार्थीहितार्थ विद्यापीठाने या संकट परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून कोणत्याच पद्धतीचे शुल्क आकारले जाऊ नये अशी मागणी ई-मेल द्वारे केली आहे. सदर विषयात अनेक विद्यार्थ्यांनी #ShameOnSPPU असा हॅशटॅग वापरून शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, सिनेट सदस्य, कुलगुरू, राज्यपाल यांना टॅग करून या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे.
लॉकडाउन चालू झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या घरी गेले आहेत. विद्यापीठाचे परीक्षा घेण्याची पद्धत अजून ठरलेली नाही. यातच विद्यापीठ विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सांगत आहे व उशीर झाल्यास विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये दंड घेतला जात आहे. विद्यापीठातील अनेक विद्यार्थी हे गरीब आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी लॉकडाउन मुळे उत्पन्न नाही.
दरम्यान, अशा काळात विद्यापीठ जे नियम व अटी लावत आहेत यावरून विद्यापीठ प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित होत आहे. असे मत पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

