Share

‘मस्का’चा धमाकेदार टीझर लाँच

Published On: 

वेब टीम- ‘खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ अशी धमाकेदार टॅगलाईन असलेल्या  ‘मस्का’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आला. अभिनेता प्रियदर्शन जाधवचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण असलेल्या ‘मस्का’ मध्ये सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित ‘मस्का’ हा चित्रपट रॉमकॉन शैलीचा आहे. आजवर सोज्ज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘मस्का’च्या टीझर मध्ये भन्नाट अशा गर्ल नेक्स्ट डोअरच्या बोल्ड भूमिकेत दिसते आहे. तसेच या टीझर मध्ये अनिकेत विश्वासराव आणि चिन्मय मांडलेकर यांच्यातील संवादावरून या कथेत स्त्री पात्राची भूमिका जबरदस्त, धमाल आणणार आहे असे दिसते. या शिवाय अभिनेते शशांक शेंडे,विद्याधर जोशी आणि प्रणव रावराणे हे कलाकार टीझर मध्ये दिसले आहेत. ‘मस्का’ मध्ये वेगवेगळी नावे वापरून पुरुषांची फसवणूक करणारी एक स्त्री असल्याचे दिसते ती नेमकी कोण? याचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे.

‘मस्का’ या चित्रपटाचे कथा लेखन आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. लेखक, अभिनेता, नाट्यदिग्दर्शक असलेले प्रियदर्शन जाधव या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. प्रियदर्शनची विनोदी शैली आणि टीझर मध्ये असलेला सस्पेन्स यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’ चे प्रशांत पुरुषोत्तम पाटील निर्माते आहेत, तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार आणि सह प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सातव आहेत. मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार चिनार – महेश यांनी स्वरसाज चढविला आहे. चित्रपटाचे छायांकन अमलेंदू चौधरी यांचे आहे आणि निलेश नवनाथ गावंड संकलक आहेत. अत्यंत हटके विषयावरील सस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी असा मनोरंजनाचा फुल टू मसाला असलेला ‘मस्का’ हा चित्रपट येत्या १ जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘मस्का’ चा टीझर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!