Share

‘सरकारने बाता हेलिकॉप्टरच्या मारल्या आणि पादुका ७१ हजारांचे बिल फाडून लाल डब्यातून नेल्या’

Published On: 

त्रंबकेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या एसटीमधून पंढरपूरला घेऊन जाण्यात आल्या आहेत. दरवर्षी लाखो वारकरी हरी नामाचा गरज करत वारीमध्ये सहभागी होतात. मात्र, सध्या जगभरासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने पालखी सोहळा रद्द करण्यात आला .

शरद पवारांच्या विरोधात सोशल मिडीयावर बदनामकारक पोस्ट टाकल्याने निलंग्यात गुन्हा दाखल

दरम्यान, पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले आहे. शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी त्यानिमित्ताने समोर आली आहे.

ही बातमी समोर आल्याने आघाडी सरकारची चांगलीच नाचक्की झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारवर चौफेर टीका आता होऊ लागली आहे. राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं होत. मात्र आता प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर केली आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही ७१ हजार रुपयांचं बिल फाडलं. निर्लज्ज सरकार, अशा शब्दांत भातखळकरांनी सरकारवर टीका केली आहे.

नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवून कोरोना संसर्गापासून दूर रहावे – जिल्हाधिकारी

आचार्य तुषार भोसले यांनी देखील याच मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे. संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी बसभाडे वसूल करणे ठाकरे सरकारला शोभते का ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण शब्द दिला होता की संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे मग विमान, हेलिकॉप्टर तर सोडाच पण बसभाडे सुध्दा सहन करण्याची ताकद महाराष्ट्र सरकारची नाही का ?

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!