Share

अमेरिका-चीनलाही जे जमलं नाही ते रशियाने करून दाखवलं, लस चाचणी परीक्षणात ठरली यशस्वी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- जगभरात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच चीनवर करोनाचा पसरवण्याचा आरोप अनेक देशांकडून करण्यात येत असून चीन कायमच आपल्यावरील या आरोपाचं खंडन करत आला आहे. तसंच आपण कोणतीही माहिती लपवली नसल्याचा दावाही चीनने अनेकदा केला होता.

यानंतर जगभरात या व्हायरसचा समूळ नायनाट करू शकेल अशी लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यातच आता रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ताने या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल. दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे वादिम तारासोव्ह यांनी सांगितले. ते इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत.

रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या. करोना व्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेतअसे तारासोव्ह यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

पुणे : लॉकडाऊनच्या धास्तीने मार्केटयार्डमध्ये पहाटेपासूनच उसळली गर्दी

सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत- आठवले

#DilSeThankYou : रात्रंदिवस काम करणार्‍या पोलिसांचे अक्षय कुमारने मानले अनोख्या पद्धतीने आभार

प्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!