Share

बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न

Published On: 

बीड : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी ना. मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत कामगार चळवळीतील प्रत्येकाच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सकाळी ठीक ८.०० वा. ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार यांसह महत्वाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

बीड पोलीस दलात सतत १५ वर्षे गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याबद्दल पोलीस हवालदार मोहन क्षीरसागर, पोलीस हवालदार गणेश दुधाळ आणि पोलीस नाईक नरेंद्र बांगर यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!