🕒 1 min read
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची व मृत्यू होणाऱ्यांची संख्या उच्चांकावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येईल अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी परवा कोल्हापूरमध्ये दिली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 15 मे रात्री 12 पासून ते 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन केले जाणार आहे. लॉकडाऊन मध्ये कोणकोणते नियम व अटी असणार याची माहिती जिल्हा प्रशासनाकडू केली जाणार आहे. आज सकाळी पालक मंत्री व जिल्ह्यातील सर्व आमदार यांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अधिकृत नियमावली उद्या घोषित केली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन एक हजार ते दीड हजार पर्यंत कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्यू दरही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे लॉकडाउन करण्या व्यतिरिक्त पर्याय नाही, अशी भूमिका सर्वच आमदारांनी घेतली. त्यानंतर शनिवारी रात्री पासून कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. जिल्यातील मृत्युदराचाही संख्या वाढत आहे, विशेषतः तरुणाच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा अपुरा आहे, औषधांचा साठा अपुरा आहे, ऑक्सिजन बेड , व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत, यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल सोबतच आता खतांच्या किंमतीतही वाढ! शेतकरी हवालदिल
- Breaking : राज्यातील लॉकडाऊन आता ‘या’ तारखेपर्यंत वाढवणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत
- कोरोनाचा कहर! उस्मानाबादेत ६७६ नव्याने बाधित तर ११ जणांचा कोरोनाने गेला बळी
- पुण्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही; महापौरांची माहिती
- म्युकरमायकोसिस वाढतोय : मुंबईत आढळले तब्बल १११ रुग्ण


