🕒 1 min read
पुणे: सध्या समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याच्यातील गर्जना ऐकून अभिमानाने सर्वांचाच ऊर भरून येईल. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या “महाराजाधिराज…राजाशिवछत्रपती…” या गर्जनेसह टाटा मोटर्सची (Tata Motors) सफारी या मॉडेलची १० हजारावी गाडी बाहेर पडली. यावेळी कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) नावाचा जयघोष केला. याचाच व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.
“टाटा मोटर्सच्या संस्कृतीचे अजून एक उत्तम उदाहरण… टाटा कंपनीच्या टाटा सफारी या मॉडेलची १० हजारावी गाडी कारखान्याबाहेर पडताना छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद देत असेम्बली लाइनवरुन बाहेर काढण्यात आली,” असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. याचाच व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. मात्र टकऱ्यांच्या मते हा व्हिडीओ पुण्यातील चाकण येथील एका शोरुमच्या उद्घाटनाच्या वेळेचा असल्याचा म्हटले जात आहे.
पाहा व्हिडिओ-
https://www.facebook.com/watch/?v=732731051036975&ref=sharing
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- विधानसभा निवडणुकींचे निर्बंध लागू होण्यापूर्वीच भाजपने घेतल्या ३९९ प्रचार सभा
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे?”,पवारांच्या बैठकीवरून भातखळकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
