Share

इस्लामपुरसह पुण्याकडून येणारी लोकं तेथेच थांबवा : सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Published On: 

कराड : इस्लामपूरमध्ये सापडलेल्या संशयितांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कऱ्हाडमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजना समाधानकारक असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्याबाहेरुन जिल्ह्यात येणारी आणि विशेषतः सांगली, इस्लामपूरसह पुण्याकडून येणारी लोकं तेथेच थांबवली पाहिजेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.

या आढावा बैठकीला प्रांताधिकारी, पोलिस उपाधिक्षक, पालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी शहरासह तालुक्यात करण्यात आलेल्या उपययोजनासंदर्भात समाधान व्यक्त करत इस्लामपूरमध्ये सापडलेल्या संशयितांच्या पार्श्वभूमीवर आणि पुण्यामधील सद्यस्थितीवरुन कऱ्हाडमध्ये व जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरुन येणारी विशेषतः सांगली, इस्लामपुरसह पुण्याकडून येणारी लोकं तेथेच थांबवली पाहिजेत, असे आवाहन अधिकाऱ्यांना करुन त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती करण्याचे आदेश दिले. याचशिवाय राज्यसरकारकडून देण्यात आलेल्या आदेशांची योग्य अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीनंतर त्यांनी कृष्णा रुग्णालयात कोरोना संशयितांसाठी तयार केलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी केली. तसेच रुग्णालय प्रशासनाने केलेल्या केलेल्या उपाययोजनांची माहिती घेत समाधानही व्यक्त केले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजना समाधानकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!