Share

संतापजनक : स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा, विनोदाच्या नावाखाली पाजळली अक्कल

Published On: 

मुंबई : मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने विनोदातून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. अखंड भारताचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा करताना तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे देशातील समस्त शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अग्रिमा म्हणाली की, शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी इंटरनेटच्या सोर्सवर गेली तर त्याठिकाणी सगळं कोरं होतं. कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माचे राजा होते, त्यांच्यामुळे मुघल काळात मंदिरं वाचली, पण या स्टँड-अप कॉमेडियन अशाप्रकारे विनोद करुन अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, हिला कठोर शिक्षा करावी अशी मागणी आता होत आहे.

दुसरीकडे नुकतेच युवासेनेतून बाहेर पडलेले रमेश सोलंकी यांनी कोट्यवधी लोकांच्या भावना अग्रिमा जोशुआच्या स्टँड-अप कॉमेडीने दुखावल्या असून तिच्याविरोधात कडक कारवाई करावी असी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्त यांना ट्विटरवरुन केली आहे.

https://twitter.com/Rajput_Ramesh/status/1281274730595545088?s=20

दरम्यान, ट्विटरवर याबाबत नाराजी पसरली असून महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी या स्टँड-अप कॉमेडियनवर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु अशा तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत असून त्यांच्याबद्दल अशी थट्टा अजिबात सहन केली जाणार नाही. या शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र करत स्वराज्य निर्माण केले. त्यांच्यावर असा विनोद करणे संतापजनक आहे अशा भावना ट्विटरवर युजर्सने मांडल्या आहेत. याबाबत ट्विटरवर शिवाजी महाराज असा हँशटॅग ट्रेंड होत आहे.

https://twitter.com/VBShelke/status/1281425325428101120?s=20

https://twitter.com/Aniket_juwar/status/1281245588214804483?s=20

https://twitter.com/rajeabhijeeth/status/1281289660879101958?s=20

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!