Share

हे वागणं बरं नव्हं! मुंबई – पुण्यात सोशल डिस्टंसिंगचे वाजले तीन-तेरा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कोव्हीड-१९ संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, नागरिक लॉकडाऊनचे नियम सर्रास तोडत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट अजून वाढते कि काय अशी भीती सगळ्यांनाच सतावते आहे. सोशलं डिस्टंसिंगचे नियम स्वतःच्या भल्यासाठी घालून देण्यात आले आहेत.पण हे नागरिकांच्या लक्षात काही येईना.

१४ एप्रिल पर्यंत बंद असलेले डोंबिवलीतील भाजी मार्केट आज उघडताच त्या ठिकाणी तोबा गर्दी बघायला मिळाली. भाजी-पाला खरेदी करणे आवश्यक असला तरी त्यादरम्यान सोशल – डिस्टंसिंग पाळणे आवश्यक असल्याचे नागरिक समजून घ्यायला तयार नाही. पुण्यातील पिंपरी – चिंचवड मधेही अशीच परिस्थिती बघायला मिळाली लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवल्या नंतर लोकांनी किराणाच्या होलसेल दुकानांमध्ये सामान खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली.

दरम्यान, काल एकाच दिवसात पिंपरी – चिंचवड मध्ये ८ नवे रुग्ण सापडले असल्याने शहरातील रुग्णांची संख्या ४३ वर गेली आहे. मात्र असे असले तरी नागरिक काही सुधरायला तयार नाहीत. या परिस्थितीला स्थानिक प्रशासन कशा प्रकारे हाताळते याकडे सर्वांचे लक्ष राहील. राज्यात मुंबई व पुण्यातच सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असल्याने याला अधिक गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!