Share

धक्कादायक : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की

Published On: 

पुणे : पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. कोथरूडमधील सहजानंद सोसोयटीजवळ दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांना जाब विचारल्याचा राग आल्यामुळे त्यांनी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की केली आहे.

आपण जे बोलतो ते करतो का, याचा विचार करा; ठाकरेंना फडणवीसांचा टोला

या धक्काबुक्कीत मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोपीनाथनगरमधील सोसोयटीजवळ घडली. अमर सयाजी बनसोडे आणि विनोद सुरेश गद्रे अशी जेरबंद केलेल्याची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. मानसी राहुल कोल्हे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील सहजानंद सोसायटीच्या आवारात चार तरुण मद्यपान करीत बसले होते. त्यामुळे तेथून जाणाऱ्या विलास कोल्हे यांनी त्यांना जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे अमर आणि विनोद यांच्यासह इतर दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे मानसी आणि त्यांचे पती राहुल त्याठिकाणी येऊन भांडणे सोडविण्याचा प्रयन्त केला असता, चौघांनी त्यांनाही मारहाण केली.

आरडाओरडा झाल्यामुळे तेथेच राहायला असलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी उपस्थित चौघांना काय झाले, अशी विचारणा केली. तेव्हा चौघांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. त्यामुळे त्यांच्या हाताच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघाना जेरबंद केले आहे. कोथरूड परिसरातील सहजानंद सोसायटी आवारात मागील काही दिवसांपासून मद्यपींचा मोठा त्रास होत असून यासंदर्भात वेळोवेळी पोलिसांना माहिती दिली जात आहे. मात्र, पोलिसांकडून वेळीच दखल घेतली जात नसल्याचे माजी आमदार कुलकर्णी यांनी सांगितले.

खबरदार हलगर्जीपणा केला तर, अजितदादांनी खासगी रुग्णालयांना भरला दम

सहजानंद सोसायटी परिसरात दिवसाढवळ्या दारू पिऊन धिंगाणा घातला जात आहे. वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार दिली असताना, कारवाई केली जात नाही. पेट्रोलिंग केले जात नसल्यामुळे मद्यपीचे फावले आहे. काल सोसायटीजवळ झालेल्या घटनेची माहिती घेताना, मला मद्यपीनी धक्काबुक्की केली. तक्रारीला राजकीय स्वरूप दिले जाऊ शकते, म्हणून मी पोलीसांकडे तक्रार केली नाही. अस मेधा कुलकर्णी यांनी सांगितल आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!