Share

हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य

Published On: 

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या फिटनेसवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शोएब अख्तरने हार्दिक पांड्या लवकरच दुखापतीचा शिकार होईल, असे भाकीत काही दिवसांपूर्वी केले होते.

2019 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून हार्दिक पांड्याचा आलेख खाली घसरला आहे. दुखापतींमुळे तो भारतीय संघाबाहेर आहे. त्याचबरोबर त्याची भारतीय संघातील कामगिरीही चांगली नव्हती. दुखापतीमुळे त्याने गोलंदाजी करणे थांबवले.

शोएब अख्तरने आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, दुबईत मी जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याशी याबद्दल बोललो होतो. त्यावेळी मी हार्दिक पांड्याच्या पाठीच्या स्नायूंना स्पर्श केला तेव्हा मला जाणवले ते खूप पातळ होते. म्हणून मी त्याला इशारा दिला की तो जखमी होऊ शकतो. त्यानंतर तो लगेच दीड तासानंतर जखमी झाला.

2018 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. तो इतका गंभीर जखमी झाला होता की त्याला स्ट्रेचरवर न्यावे लागले. तेव्हापासून त्याच्या कारकिर्दीवर खूप परिणाम झाला आहे. आयपीएलमध्ये तो फक्त फलंदाज म्हणून सहभागी झाला होता. हार्दिक पंड्याचा भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे, मात्र त्याच्या गोलंदाजीमुळे संघाचा समतोल तितकासा चांगला नाही.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!