टीम महाराष्ट्र देशा : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या जर्सीच्या आक्षेपावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांकडे चर्चेत राहण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीचा विषय काढला जात आहे, अशी टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली.
आयसीसीच्या नियमानुसार भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग बदलून भगवा करण्यात आला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या सामान्या दरम्यान भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी यावर आक्षेप घेतला.
अबू आझमी यांच्या या आक्षेपावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या जर्सीवरून विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. धकांकडे चर्चेत राहण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीचा विषय काढला जात आहे अशी टीका, गुलाबराव पाटील यांनी केला.

