14 ते 29 जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या आयसीसी (ICC) 19 वर्षाखालील महिला टी-20 विश्वचषक (Under 19 Women T-20 World Cup) संघाची घोषणा करण्यात आली आहे. या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची सलामी फलंदाज शेफाली वर्मा (Shefali Varma) संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षाखालील संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी द्विपक्षीय मालिकेसाठी देखील भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
शेफाली वर्माने भारताच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर 21 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय , 46 टी-20 आंतरराष्ट्रीय, दोन कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान, शेफाली वर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये देखील संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 19 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेसाठी 16 संघांचा सहभाग नोंदवला गेला आहे. यामध्ये युएस, स्कॉटलंड, भारत, दक्षिण आफ्रिका आदी संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 29 जानेवारी रोजी खेळायला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी शेफाली वर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघामध्ये श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष, जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पाश्र्वी चोप्रा, तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री या खेळाडूंचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसोबतच शेफाली 19 वर्षाखालील होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी देखील भारतीय संघाचे कर्णधार पद समान आहेत. यामध्ये भारतीय संघात श्वेता सेहरावत, ऋचा घोष, जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पाश्र्वी चोप्रा, तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी राखीव खेळाडू : शिखा, नजला सीएमसी, यशश्री या खेळाडूंचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “सरकार चालविण्यापासून ते…”, उद्धव ठाकरेंची सरकार चालवण्याची तयारी
- MVA | सरकारविरोधात 17 डिसेंबरला महाविकासआघाडीचा महामोर्चा
- Vasant More | अजित पवारांच्या ऑफरनंतर वसंत मोरेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले,
- Uddhav Thackeray | “महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होतोय”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- Gujarat Election | गुजरात निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात ‘इतके’ टक्के मतदान, निकालाकडे लक्ष


