मुंबई : मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने विनोदातून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. अखंड भारताचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा करताना तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे देशातील समस्त शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अग्रिमा म्हणाली की, शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी इंटरनेटच्या सोर्सवर गेली तर त्याठिकाणी सगळं कोरं होतं. कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माचे राजा होते, त्यांच्यामुळे मुघल काळात मंदिरं वाचली, पण या स्टँड-अप कॉमेडियन अशाप्रकारे विनोद करुन अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, हिला कठोर शिक्षा करावी अशी मागणी आता होत आहे.
यावर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया देत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी राज्य सरकार कधीच खपवून घेणार नाही, अस म्हंटल आहे. या स्टँडअप कॉमेडियच्या व्हिडीओची तपासणी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात येतील. या व्हिडीओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील आणि काही आक्षेपार्ह असेल तर तात्काळ त्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही शंभुराज देसाई यांनी दिली आहे.
दरम्यान. ट्विटरवर याबाबत नाराजी पसरली असून महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी या स्टँड-अप कॉमेडियनवर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु अशा तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत असून त्यांच्याबद्दल अशी थट्टा अजिबात सहन केली जाणार नाही. या शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र करत स्वराज्य निर्माण केले. त्यांच्यावर असा विनोद करणे संतापजनक आहे अशा भावना ट्विटरवर युजर्सने मांडल्या आहेत. याबाबत ट्विटरवर शिवाजी महाराज असा हँशटॅग ट्रेंड होत आहे.
Chattrapathi Shivaji Maharaj is a KING of HINDU Religion because he saved 90% of Acient Temples in India from Mughals. But now this idiot She should be punish immediately #shivajimaharaj #shivaji_maharaj #Shivaj
दो कौड़ी के कॉमेडियन।— Vaibhav Shelke (@VBShelke) July 10, 2020
How dare she speaks in this manner about Chatrapati Shivaji Maharaj ?
And the worst part being people are laughing on this joke!!
जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगा!
Report this account @Agrimonious !https://t.co/jjjCU2lZyH
— Aniket Juwar (@Aniket_juwar) July 9, 2020
Arrest this girl @agrimonious on immediate basis for insulting
????Chhatrapati Shivaji Maharaj????.
Don't play with Maharashtra people's emotions????????????????????????@MumbaiPolice @CMOMaharashtra #ShivajiMaharaj 'shivaji maharaj' pic.twitter.com/gzA8dVi1KK— abhijeethmali (@rajeabhijeeth) July 9, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

