Share

Shahajibapu Patil | बच्चू कडू अन् रवी राणा यांच्या वादावर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Shahajibapu Patil | मुंबई : बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांचा वाद अखेर आज मिटण्याची शक्यता आहे. दोघेही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीला जाणार आहे. अशातच शिंदे गटातील म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राणा आणि कडू हे दोन्ही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द पाळतील, असा विश्वास शहाजीपाबू यांनी व्यक्त केला आहे. गेली चाळीस वर्षे गणपतराव देशमुख आणि शहाजी पाटील यांचे सांगोला तालुक्यातील घराघरात आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते आहे. उद्धव ठाकरे सांगोला तालुक्यात आल्याने काही फायदा होणार नाही सांगोला तालुका शेतकरी कामगारांचा पक्षाचा आहे असं म्हणत सांगोला तालुक्यात यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा दौरा केला आहे. सांगोला तालुक्यात उद्धव ठाकरे आले. म्हणून काही फरक पडणार नाही, असंही शहाजीबापू म्हणाले.

माझी जी बदनामी राणा यांनी केली त्याबतीत पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांनी त्याबद्दल माफी मागावी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच, रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे सगळ्या आमदारांवर आरोप केल्याचं दिसून येत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

माझी आमदार रवी राणा सोबत बैठकीला बसण्याची माझी इच्छा नाही. पण मुख्यमंत्री काय म्हणतात ते पाहू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना कडू म्हणाले आहेत की, एक तारखेच्या अल्टीमेंटममध्ये सध्या फेरबदल नाही. रवी राणा उत्तर जर समाधानकारक मिळालं तरच कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!