भारत दौऱ्यातल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळवण्यासाठी मार्कस स्टॉईनिस आणि ग्लेन मॅक्सवेल या व्हिक्टोरियाच्या खेळाडूंमध्ये मुख्य चुरस आहे. मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला सहाव्या क्रमांकावर एखाद्या अष्टपैलू शिलेदाराची गरज आहे. ग्लेन मॅक्सवेल हा आधीपासूनच ऑस्ट्रेलिया संघाचा घटक आहे. त्याचा त्याला लाभ होऊ शकतो. पण स्टॉईनिसची अष्टपैलू गुणवत्ता आणि प्रामुख्याने त्याचे स्विंग गोलंदाजीतले कौशल्यही दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघातल्या वाढत्या दुखापती लक्षात घेता अॅश्टन अॅगर आणि उस्मान ख्वाजा यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.
Join WhatsApp
Join Now🕘 संबंधित बातम्या
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही


