🕒 1 min read
पुणे : माभागावरून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावावामुळे देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय. चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवले जात असल्याने चीनकडून आता भारताला थेट इशारा देण्यात आला आहे. भारतामध्ये काही अति राष्ट्रप्रेमी आमच्या वस्तूंबद्दल अफवा पसरवतायत. पण आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनल्यायत. हा ७ हजार कोटींहून देखील मोठा व्यवसाय आहे. चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये या संदर्भात वृत्त आले आहे.
मात्र आता यावरून चांगलच वातावरण पेटायला सुरवात झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा मागणीला पाठींबा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांचे आर्थिक कंबरडे मोडायला हवे असं राऊत यांनी म्हटलं आहे.
आज पुण्यामध्ये ब्राम्हण महासंघातर्फे चीनी मालाची होळी करण्यात येणार आहे. याचसंदर्भातील वृत्ताचा व्हिडिओ शेअर करत राऊत यांनी चीनला धडा शिकवण्याची हीच वेळ असल्याचे म्हटलं आहे. “ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आज पुण्यात चिनी मालाची होळी करत आहेत. वीर सावरकरांनी परदेशी मालाची होळी करण्यासाठी जी जागा निवडली तेथेच हे आंदोलन होत आहे. चीनचे आर्थिक कंबरडे मोडून काढणे हाच एक सर्जिकल स्ट्राइक आहे. चीनला धडा शिकवावा लागेल. वंदे मातरम!,” असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.
https://t.co/YUPLvKB2EU
ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते
आज पुण्यात चिनी मालाची होळी करत आहेत. विर सावरकरांनी परदेशी मालाची होळी करण्यासाठी जी जागा निवडली तेथेच हे आंदोलन होत आहे. चिनचे आर्थीक कंबरडे मोडून काढणे हाच एक surgical strike आहे. चीनला धडा शिकवावा लागेल.
वंदे मातरम!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 8, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
