औरंगाबाद : गेल्या विधानसभेला प्रचंड मोठी फिक्सिंग झाली अशी टिका करणारे भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर प्रतिक्रिया देताना त्यांचे आरोप हे फक्त ब्रेकिंग न्युजसाठी होते, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. औरंगाबाद येथील सोमवारी झालेल्या विभागीय आढावा बैठकीत काँग्रेस नेते अमित देशमुख तसेच भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात जुगलबंदी रंगली.
दरम्यान, मराठवाडा विभागीय बैठकीवर संभाजी पाटील निलंगेकर यांनी आरोप करताना म्हणाले की, ही बैठक मराठवाड्याची चेष्टा करणारी बैठक आहे. येणारा अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या वाटेला काही येणार नाही. तसेच या बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्रीही बोलु शकले नाही. असे म्हणत निलंगेकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीवर आरोप केले. काही दिवसांपुर्वी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गेल्या विधानसभेला फडणवीस, ठाकरे, देशमुख यांनी एकत्रित येऊन राजकीय फिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. या फिक्सिंगमध्ये फक्त शिवसेना, काँग्रेसचे नेतेच नाही तर खुद्द भाजपचेही नेते होते, असंही त्यांनी सुचित केल होत.
काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख निवडून यावेत म्हणून शिवसेनेनं फिक्सिंग केल्याचा थेट आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. त्यासाठी फारशी ओळख नसलेला उमेदवारही दिला आणि हे सगळं वरळीसाठी सेनेनं सेटिंग केली असंही त्यांचं म्हणणं आहे. अमित देशमुख यांचे धाकटे बंधू धीरज देशमुख, देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तिघांना निवडून आणण्यासाठी तीन पक्षांचे राजकीय फिक्सिंग झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप निलंगेकरांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘वो नही करेंगे तो हम करके दिखायेंगे’, सरदार वल्लभभाईंच्या पुतळ्यावरून काँग्रेसचा शिवसेनेला इशारा
- ‘पूजा चव्हाण यांच्या वडिलांचे स्टेटमेंट अतिशय दुर्दैवी’
- एकच फाईट वातावरण टाईट… पडळकरांनी पवारांवर टीका केली आणि अवघी राष्ट्रवादी त्यांच्यावर तुटून पडली
- आदिवासी भिल्ल समाजातील लोकांचे प्रश्न मार्गी लावणार-संदिपान भुमरे
- भाजप नेत्यांच्या दौऱ्याला गैरहजर राहणारे संजयकाका जयंत पाटलांच्या शेजारी बसतात तेव्हा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

