Share

अवघ्या काही दिवसावर आलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अवघ्या काही दिवसांवर दसरा आल्याने या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी अनेकांचे लगबग चालू असते. अनेकजण या दसऱ्याच्या दिवसासाठी सोने खरेदी करून ठेवत असतात. मात्र आज सोन्याच्या किंमती काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला दसऱ्यासाठी सोने खरेदी करायचे असेल तर वेळीच करा.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या भावात 0.19 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,141 रुपये इतका झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही 0.02 टक्क्यांची वाढ होऊन चांदीचा प्रतिकिलो दर 60,693 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या 9059 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र पुढील काळात सोन्या- चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ होऊ शकते. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत जाऊ शकते. तर पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव  10 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!