Share

पाण्यासाठी दाहीदिशा, सिडकोवासियांवर जलसंकट कायम

Published On: 

औरंगाबाद : मागील आठवड्यात रेल्वेस्टेशन रोडवरील अहिल्याबाई होळकर चौकात फुटलेल्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीमुळे सिडको-हडकोतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आठवडाभराचा कालावधी उलटूनही अद्याप सिडकोतील काही वसाहतींना याचे चटके बसत आहे. काही भागांतील पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची ऐनवेळी पाण्यासाठी तारांबळ उडत असून नागरिकांतून संताप व्यक्‍त केला जात आहे.

आठवडाभरापूर्वी रेल्वेस्टेशन रोड, क्रांतीचौक, पैठण रोड, बीड बायपास रोड या ठिकाणी जलवाहिन्यांना मोठी गळती लागली होती. रेल्वेस्टेशन रोडवरील अहिल्याबाई होळकर चौकात तर १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा अर्ध्या रात्री अचानक स्फोट झाला होता. या घटनेत वाहिनीला मोठे भगदाड पडल्याने २४ तासांपेक्षा अधिक कालावधी तिच्या दुरूस्तीसाठी लागला. परिणामी, या काळात जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद होता. त्यावेळी तीन दिवसांत सर्व ठिकाणांवरील दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली.

दरम्यानच्या काळात सिडको वगळता इतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर पालिकेने भर दिला. त्यामुळे सिडको-हडकोतील जलकुंभांमध्ये कमी पाणी आले. परिणामी, आता शहरातील इतर भाग सुरळीत झाला असताना सिडको-हडकोतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो सुरळीत करण्याच्या हेतून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने काही वसाहतींना एक दिवसाचा गॅप दिला आहे. मात्र पालिका प्रशासनाने याची पूर्वकल्पना न दिल्याने ऐनवेळी नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडाल्याचे चित्र मंगळवारी सिडकोतील काही भागांत दिसून आले.

‘याठिकाणी’ पाण्याचा ठणठणाट
सिडको एन-६ मधील अविष्कार कॉलनी, चिश्तीया कॉलनी यांसह एन-५, एन-७ या भागांतील काही वसाहतींत मंगळवारी नळांना पाणी येण्याचा दिवस होता. मात्र ऐनवेळी या भागातील नागरिकांना पाण्याचा टप्पा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडाली. काहींनी खासगी टँकर मागवले. तर काहींना परिसरातील जार विक्रेत्यांकडून पाणी विकत घ्यावे लागले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!