Share

एस.टी.च्या १ हजार १० रोजंदारी कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती

Published On: 

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एस.टी.च्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्याप्रमाणे अशा सर्व १ हजार १० कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती देण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्गमित केले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.

हे रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरीदेखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एस.टी.चे आर्थिक नुकसान होताना प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय देखील झाली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती.

सेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याबाबत प्राप्त झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहनमंत्र्यांनी निदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या आदेशाचे पालन करत अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्चित केले असून यासंदर्भातील परिपत्रक दि. २५ जून२०१८ रोजी निर्गमित केले आहे.

या परिपत्रकाप्रमाणे ज्या चालक तथा वाहक (कनिष्ठ), सहाय्यक लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) यांनी दि. ८ जून व दि. ९ जून २०१८ रोजी झालेल्या अघोषित संपात सहभाग घेतला आहे व ज्यांची सेवा विभाग/ घटक प्रमुख यांनी समाप्त केली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!