Share

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पर्यटनाला चालना; पंतप्रधान मोदींच्या हस्ते ८ लक्झरी ट्रेनच उद्घाटन !

Published On: 

🕒 1 min read

केवडिया: कोरोना काळात देशातील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर गुजरात मधील सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी केवडीया या शहराला जोडणाऱ्या ८ लक्झरी रेल्वेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.

या आठ गाड्या वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रताप नगर इथून केवडीयाला जोडण्यात येणार आहेत. उत्तर भारतीय रेल्वेच्या नकाशामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी ला स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील पर्यटक विनाअडथळा या स्थळाला भेट देऊ शकतील. त्याचबरोबर या रेल्वे गाड्या लक्झरी असून  पर्यटक नर्मदा नदीच्या मनोरम्य दृष्याच आनंद घेऊ शकतात. अस रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!