Share

लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळीत प्रचंड प्रमाणात घटली

Published On: 

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनमुळे एका महत्त्वाची बाब समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी प्रचंड कमी झाली आहे. दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे या तीन शहारातील हवामानात चांगलाच फरक पडल्याची माहिती हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने दिली आहे.

हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने Centre-run System of Air Quality and Weather Forecasting and Research (SAFAR) दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. तर ऑफिसेस बंद असल्याने रस्त्यांवरील वाहतूकही बंद झाली आहे. परिणामी हवेतील प्रदूषणाची पातळी चांगली कमी झाली आहे. दिल्लीत प्रदूषणाची पातळी 30 टक्क्यांनी तर पुणे आणि अहमदाबादमुळे 15 टक्क्यांनी कमी झाली आहे.

श्वसनाचे आजार वाढविणाऱ्या, नायट्रोजन ऑक्साईडच्या (एनओएक्स) प्रदूषणाची पातळीदेखील कमी झाली आहे. नायट्रोजन ऑक्साईडचं प्रदूषण मुख्यतः मोटार वाहनांच्या वाहतुकीमुळे होतं. पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण 45 टक्क्यांनी कमी झालं आहे. तर मुंबईत 38 टक्क्यांनी आणि अहमदाबादमध्ये 50 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने दिली आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे लोक घरीच आहेत. अनेक जण वर्क फ्रॉम होम करतायेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कच्च्या मालाची वाहतूकही बंद आहे. वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाली आहे. कधीही न थांबणारी मुंबई, पुणे, अहमदाबादसारखी अनेक मोठी व्यापारी शहरं कोरोनामुळे ठप्प झाल्याने याचा परिणाम हवेतील प्रदूषणावर होताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!