🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १८ मे पूर्वी हा लॉकडाऊन कसा असेल याची माहिती दिली जाईल अस मोदींनी सांगतिले. तर यावेळी मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा देखील केली. देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी हे पॅॅकेज असणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
यावर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांना ठोस सांगायच नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे? पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची नाहीय. केंद्रीय अर्थमंत्री किंवा राज्यांतील मुख्यमंत्र्यांकरवी तशा बातम्या वदवून घेतल्या जातील. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
It seems that @PMOIndia doesn't want to deliver the bad news or harsh details himself. It's left for @nsitharaman or the CM's to deal with. It maybe his PR routine.
But if the PM doesn't want to say anything concrete, why come live and confuse the entire nation? #Lockdown4— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 12, 2020
दरम्यान मोदींनी 20 लाख करोडचं आर्थिक पॅॅकेज जाहीर करत देशात लॉकडाऊन वाढणार असल्याचे घोषित केले. यावरून कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत टीका केली. आपण माध्यमांना हेडलाईन दिली पण गरिबांना हेल्पलाईनची गरज आहे, हे कधी देणार ? असा सवाल विचारण्यात आला आहे, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत हा सवाल केला आहे.
1/2
मा. मोदी जी,आपने सम्बोधन से मीडिया को ख़बर बनाने को “हेडलाइन” तो दे दी पर देश को “मदद की हेल्पलाइन” का इंतज़ार है।
वादे से हक़ीक़त तक का सफ़र पूरा होने का इंतज़ार रहेगा।
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 12, 2020
पंतप्रधान मोदीजी, तुम्ही तुमच्या भाषणातून देशातील मीडियाला वृत्त छापण्यासाठी ‘हेडलाइन’ तर दिली, पण देशाला अद्यापही मदतीच्या ‘हेल्पलाइन’ची गरज आहे….घरी परतणाऱ्या मजूर, कामगार, गरिब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचं आहे… तुम्ही त्याबाबत काही घोषणा कराल अशी अपेक्षा होती… पण, देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर व श्रमिकांप्रति आपल्या निष्ठुरता आणि असंवेदनशीलतेमुळे निराश आहोत, असे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
